प्रख्यात अभिनेते श्री चिन्मय उदगीरकर हे आता हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीचे अधिकृत ब्रॅंड ॲम्बेसेटर.

आम्ही, हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अभिमानाने जाहीर करत आहोत की प्रख्यात अभिनेते श्री चिन्मय उदगीरकर हे आता हर्षल हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीचे अधिकृत ब्रॅंड ॲम्बेसेटर म्हणून आमच्या सोबत आहेत. त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि व्यक्तिमत्वाने अभिनय क्षेत्रात आपली एक खास ओळख निर्माण केलेली आहे. ते आपल्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. श्री चिन्मय उदगीरकर यांना आमच्या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेटर म्हणून निवडण्यामागचे कारण म्हणजे त्यांची मेहनती वृत्ती, प्रामाणिकपणा, आणि उत्कृष्टतेबद्दलची वचनबद्धता! हे गुण आमच्या कंपनीच्या मूलभूत तत्त्वांशी पूर्णपणे जुळतात. ज्या प्रकारे श्री चिन्मय उदगीरकर हे आपल्या कामगिरीत सातत्याने गुणवत्ता आणि विश्वासार्हता राखतात, त्याच प्रकारे आम्ही देखील आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि वास्तू समाधान देण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यांची लोकप्रियता व प्रतिष्ठा यामुळे कंपनीला एक नवा आयाम मिळणार आहे. आम्ही त्यांच्यासोबतच्या या सहकार्यातून अत्यंत सकारात्मक बदल आणि विकासाची अपेक्षा करतो. श्री चिन्मय उदगीरकर यांच्या विश्वासहार्यतेमुळे आम्हाला आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात आणि त्यांच्याशी दृढ संबंध निर्माण करण्यात अमुल्य सहाय्य मिळेल. आमच्या आगामी प्रोजेक्टसाठी आणि ग्राहकांच्या विश्वासहार्यतेसाठी ही पार्टनरशिप एक नवा मापदंड निर्माण करेल याचा आम्हाला विश्वास आहे.असे हर्षल हणमंते बिल्डर्स चे संचालक सौ स्नेहा हणमंते व हर्षल हणमंते यांनी सांगितले.या संपूर्ण प्रोसेस मध्ये आपल्या कंपनी चे मार्केटिंग हेड पंकज वर्मा यांचे देखिल मोलाचे सहकार्य लाभले.

© Harshal Hanmante Builders & Developers. All Rights Reserved.